Belagavi

देश प्रथम” अशी भावना नेहमी बाळगा : लेफ्टनंट कर्नल विनोदिनी शर्मा

Share

बेळगावच्या लिंगायत महिला समाजातर्फे शुभ-श्रावणोत्सव व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

शहरातील लिंगायत भवन येथे काल, शनिवारी सायंकाळी श्रावण महिन्यानिमित्त हळदीकुंकू व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी लिंगायत महिला मंडळाच्या सदस्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य करून आनंद साजरा केला. सदस्यांनी सैनिकांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेणारे नृत्य सादर केले.


कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लेफ्टनंट कर्नल विनोदिनी शर्मा यांचा लिंगायत महिला समाजातर्फे सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना विनोदिनी शर्मा म्हणाल्या की, देश सर्वप्रथम, अशी भावना सैनिकांमध्ये आहे. त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. आपण सर्व नागरिकांची हीच भावना असायला हवी. युक्रेन हा छोटासा देश असला तरी तो बलाढ्य रशियाच्या विरोधात उभा आहे. तिथले सैनिक जीवाचे रान करून शौर्य आणि साहस दाखवत आहेत. आपले सैनिक आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून सीमेवर निस्वार्थपणे काम करतात, असे सांगून त्यांनी सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले.

लिंगायत महिला समाजाच्या संस्थापक अध्यक्षा शैलजा भिंगे, शैलजा पाटील, रत्नप्रभा बेल्लद, ज्योती बदामी, माधुरी उप्पिन, डॉ. भारती मठद, अध्यक्षा वीणा चिन्नावर, सचिव गीता गुंडकल्ली आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Tags:

belgaum lingayat sangthan cr vinodini sharma