विजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर दरोडेखोरांचा अधिक धोका वाढत आहे. या मार्गावरून वाहनधारकांना अडवून लुटमारीचे प्रकार घडत आहेत. अलीकडे हा प्रकार वाढत चालला असून हातात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या टोळीचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्कवर वायरल होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी कारवाई केली आहे.
व्हॉइस : अलीकडे विजापूर जिल्ह्यात सोशल साईटवर एक व्हिडीओ वायरल होताना दिसत होता. हातात पिस्तूल आणि इतर शस्त्रे घेऊन महामार्गावर वाहनांना रोखण्यात येत होते. यानंतर त्यांच्याकडील ऐवज लंपास करण्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेत सापळा रचून आरोपींना अटक केली आहे.
जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी एच डी आनंदकुमार, डीवायएसपी सिद्धेश्वर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी सापळा रचून अटक केली.विजू इलियास विजय बिराप्पा कराडे(२३), आनंद मायाप्पा देणारे, सचिन मधू गोपाने (२०), नवनाथ मगोंड कराडे (२०). सचिन विलास काळे(२१), विकास लक्ष्मण ढाणे(२०) हणमंत जयाप्पा खरात(२), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून २८ हजार रुपयांचे दोन मोबाईल संच, २५०० रुपयांचे मनगटी घड्याळ, ८२०० रुपये रोख, ५ मोटार बाईक यासह एकूण ५ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ()
हे सर्व आरोपी २५ वर्ष वयोगटातील असून हे सर्व आरोपी ऊस तोडणी कामगार आहेत. ऊस तोडणीसाठी आलेल्या या सर्वांनी गॅंग रचून रात्रीच्यावेळी लूटमार करण्याचे काम करण्यात येत होते. यातील चौघे आरोपी हे विजापुरातीलच आहेत तर तीन आरोपी महाराष्ट्रातील आहेत. हे सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. ()
कमी वेळेत पैसे कमावून श्रीमंत होण्याची चुकीची स्वप्ने पाहात या आरोपींनी हा चुकीचा मार्ग निवडलाय. तोंडाला मास्क लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीला आखेल विजापूर पोलिसांनी अटक केली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. शिवाय पोलिसांनी केलेल्या कार्याचे कौतुकही होत आहे.


Recent Comments