Belagavi

शिवसेना सदस्य नोंदणीसाठी संपर्काचे आवाहन

Share

शिवसेनेचेगाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिकया मोहिमेअंतर्गत सुरु झालेले सदस्य नोंदणी अभियान शिवसैनिकांनी प्रत्येक घराघरापर्यंत पोहचवावे, असे आवाहन शिवसेनेचे बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी केले आहे.

मराठी आणि मराठ्याची ताकद आजपर्यंत आपण विसरलेलो नाही. आमच्या शांततेचा गैर फायदा घेऊन हिंदुत्वाची बनावट शाल पांघरणाऱ्या ढोंगी लोकांना आता मराठ्यांची एकी दाखवावीच लागेल. यासाठी सीमाभागात आता शिवसेना बळकट करण्यासाठी आपले सदस्य नोंदणी करण्याची गरज आहे.

ज्या गोर-गरीबांचे प्रश्न सोडविता येतील त्या सर्वांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवावे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार “गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” अभियान राबवून शिवसैनिकांनी एकजुटीने पक्षाच्या कामाला लागावे. शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी “माझे घर, माझी जबाबदारी” हे अभियान सुरु केले. त्याचे परिणाम आता दिसू लागलेत.  मुख्यमंत्र्यांनी घेतलेले जनहिताचे निर्णय आपणा सर्वांना घराघरापर्यंत, गावागावापर्यंत पोहचवायचे आहेत.  सीमाभागातील शेतकरी सुखी व्हावा, मराठी युवक व महिलाना योग्य तो मान मिळावा याकडे शिवसेनेचे लक्ष आहे. यासाठी सर्व मराठी जनता नक्कीच एकत्र येईल असा विश्वास श्रीसचिन गोरले यांनी व्यक्त केला आहे. समाजकारणासोबतच आगामी प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना राजकारणात उतरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शिवसेना सभासद नोंदणीसाठी पिरनवाडी नाका, बेळगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालय बाजूला असलेल्या  बेळगाव तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात संपर्क साधावा. शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्याशी 8197664747, उप तालुका प्रमुख पिराजी शिंदे यांच्याशी 94800 53713 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Tags:

SHIVSENA