बेळगावात काही दिवसांतच गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मतदारसंघातील श्रींच्या पारंपरिक आगमन–विसर्जन मार्गावरून दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज पायी फिरून गणेशोत्सव मिरवणुकीसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांची पाहणी केली.
याच महिन्याच्या 31 तारखेला गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर बेळगावात गणेशोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज शहराच्या दक्षिण भागाचा पाहणी दौरा केला.
त्यांनी दक्षिण मतदार संघातील शहापूर परिसरातील विविध पारंपारिक मार्गांचा दौरा करून उपलब्ध सुविधांची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. लटकलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त कराव्यात, रस्त्याच्या मधोमध आलेल्या झाडे व फांद्या तोडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व नगरसेवक, मनपा आयुक्त, अधिकारी, गणेशोत्सव महामंडळ सदस्यांसह गणेशाच्या आगमन -निर्गमन मार्गाची पाहणी करण्यात आली. दोन-तीन दिवसांत काम सुरू होईल. इतर ठिकाणाहून बेळगावात येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली दुकाने दुकानदारांना दमदाटी करून बंद करण्याची सक्ती करू नये, असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले. 
आगामी गणेशोत्सवासाठी महापालिका आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी सांगितले. रस्त्यांवर तयार झालेले खड्डे बुजवले जातील. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप बांधण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘एक खिडकी’ योजनेतून परवानगी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. (
लोकमान्य टिळक सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी इन न्यूज-आपली मराठीला अधिक माहिती दिली. बेळगावच्या दोन सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळांची बैठक घेऊन उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि दक्षिणचे
यावेळी बेळगाव लोकमान्य सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक, हेस्कॉम, महानगरपालिका तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या पाहणी दौऱ्यात भाग घेतला.


Recent Comments