Vijayapura

ऐतिहासिक बसवन बागेवाडीत बसवेश्वर यात्रेचा जल्लोष

Share

बसवण्णांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक बसवन बागेवाडीत प्रथमच पाच दिवसांच्या बसवेश्वर यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज यात्रेच्या निमित्ताने आयोजित वजन उचलण्याच्या स्पर्धेचा आनंद क्रीडा रसिकांनी लुटला. यासंबंधीचा हा वृत्तांत

विश्व मानव बसवेश्वरांचे जन्मस्थान असलेल्या बसवन बागेवाडी येथे बसवेश्वर यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे आधी तीन दिवस बसवेश्वर यात्रा साजरी करण्यात येत होती. ती प्रथमच पाच दिवस साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आहे. 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान यात्रा साजरा होत आहे. या दरम्यान दररोज अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.  त्यानुसार आज वजन उचलण्याच्या वजन उचलण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्याचे आयोजक श्रीकांत नायक यांनी सांगितले. आज आयोजित केलेल्या वजन उचलण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्रासह राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या मल्लांनी आपली ताकद दाखवली. विजापूर जिल्ह्यातील नागठाण गावातील एका युवकाने २०३ किलो वजनाचा दगड उचलून पराक्रम गाजवला तर एका बालकाने वाळूचे पोते उचलून स्पर्धा गाजवली. गोल आणि चौक दगड उचलणाऱ्या बाहुबलींना उपस्थित प्रेक्षकांनी शिट्ट्या वाजवून आणि टाळ्या वाजवून जल्लोष करत चिअर अप केले. या स्पर्धेबाबत यात्रा समितीचे पदाधिकारी शंकरगौडा बिरादार यांनी अधिक माहिती दिली. बसवन बागेवाडीत प्रथमच पाच दिवसांची बसवेश्वर यात्रा उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त सर्पमुर्ण पाच दिवस अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसह खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags: