Belagavi

आ. अनिल बेनके यांच्याकडून प्रादेशिक आयुक्तांचे स्वागत

Share

बेळगावचे प्रादेशिक आयुक्त म्हणून ज्येष्ठ आयएएस अधिकारी के. पी. मोहनराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.

बेळगावचे प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांची सरकारने बदली करून त्यांच्याजागी ज्येष्ठ आयएएस अधिकारी के. पी. मोहनराज यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी काल बुधवारी सूत्रे स्वीकारली. दरम्यान, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उभयतांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली.

Tags:

belagaumnewRC RC