कर्जाचा बोजा सहन न झाल्याने युवकाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील येडूरटेक येथे घडली.

30 वर्षीय कृष्णा दुंडाप्पा पाटील या युवकाने येडूरटेक येथे आत्महत्या केली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. कर्ज फेडता न आल्याने त्यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. जुने येडूर गावातील एस.सी. कॉलनी, येथे नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.
अंकली पोलीस ठाण्याच्या पीएसआय रुपाली गुडगी, हेडकॉन्स्टेबल सूर्यकांत नाईक, ए.एस. सप्तसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


Recent Comments