अडत व्यापारी असलेल्या कार चालकाचे इतरत्र लक्ष वेधून 18 लाख रुपयांची बॅग लांबवल्याची घटना विजापूर जिल्ह्यात घडली आहे.
होय, दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी कारच्या बोनेटवर तेल ओतून चालकाचे इतरत्र लक्ष वेधले अन काही कळायच्या आत 18 लाख रुपये असलेली कारमध्ये ठेवलेली बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना आज बुधवारी विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरात घडली. अडत व्यापारी सिद्धराम कापसे यांना या घटनेत लुटण्यात आले.
कापसे हे विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी बीके गावातील रहिवासी आहेत. कापसे यांनी आज चडचणमधील कर्नाटक बँकेतून पैसे काढले. ते त्यांनी एका बागेत भरून आपल्या कारमध्ये ठेवले. ते जाण्यासाठी निघाले असतानाच दुचाकीवरून आलेल्या भामट्याने बॉनेटवर तेल घाण असल्याचे सांगून त्यांचे इतरत्र लक्ष वेधले. कापसे बॉनेटकडे जात असताना भामट्यांच्या साथीदारांनी कारमधील बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments