बेळगावमधील चन्नम्मा सर्कलजवळील राणी चन्नम्मा मूर्तीच्या आसपास असलेले कंपाउंड विस्तारण्यात यावे, जेणेकरून मूर्ती परिसरात होणारे अपघात टळतील, गेल्या अनेक वर्षांपासून हि मागणी करण्यात येत असून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करवेच्या शिवरामगौडा गटाने केलाय.
राणी चन्नम्मा चौकातील रहदारी वाढली आहे. त्यामानाने चन्नम्मा मूर्ती परिसर थोडा आखूड जागेत आहे. या चौकातील मूर्ती परिसर विस्तारण्यासाठी मुबलक जागा असून मूर्ती परिसराचा विस्तार करण्यासाठी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र आजतागायत कोणत्याही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही.
मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील एका वाहनचालकाने मूर्तीच्या कम्पाउंडला धडक दिली. वाहनावरील नियंत्रण सुटून अतिशय वेगाने आलेल्या वाहनाने चन्नम्मा चौथऱ्याला धडक दिली. सुदैवाने मूर्तीला कोणतीही इजा पोहोचली नाही आणि अनर्थ टळला. यामुळे पुढील काळात असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी अधिकाऱ्यांनी मूर्ती परिसर विस्तारण्याची आवश्यकता आहे. यासाठी आज करवेच्या शिवरामगौडा गटाने निदर्शनाने करत घोषणाबाजी केली.
यावेळी कस्तुरी बावी या बोलताना म्हणाल्या, या प्रश्नी अधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. काळ रात्री सुदैवानेच पुढील अनर्थ टळला मात्र मूर्ती परिसराचे, चौथऱ्याचे नुकसान झाले आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने दखल घेऊन मूर्ती परिसर विस्तारावा अशी मागणी बावी यांनी केली. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती परंतु त्यावेळी आपल्याला हाकलवून लावले, असा संताप यावेळी व्यक्त झाला.


Recent Comments