हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयाच्या राजा लखमगौडा जलाशयाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगी रंगात सजविण्यात आले होते.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरात निरंतर पडणाऱ्या पावसामुळे हिडकल जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. जलाशयाचे दहा दरवाजे संपूर्णपणे उघडण्यात आले असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पाटबंधारे विभागाच्यावतीने या जलाशयाला तिरंगी रंगांचा टच देण्यात आला होता.
आकर्षक अशा विद्युत रोषणाईने जलाशय परिसर उजळून निघाले होते. हि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी हजारो पर्यटक जलाशय परिसरात भेट देत असून मुंबईहून आलेल्या एका पर्यटकाने इन न्यूज वाहिनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर कर्नाटकात प्रथमच अशापद्धतीने जलाशयाला सजावट करण्यात आल्याने पाटबंधारे विभागाच्या या कार्याचे अनेक स्तरावर कौतुक होत आहे.


Recent Comments