एम के हुबळी परिसरात ड्रेनेजचे पाणी प्रमुख मार्गावरून वाहात असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. शहरांतर्गत नाल्याचे पाणी शहरातील मुख्य रस्त्यावर शिरले असून नागरिकांना नाक बंद करून जाण्याची वेळ आली आहे.. नगरपंचायतीच्या या कारभाराबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
हुबळी शहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मुख्य रस्त्यालगत ड्रेनेजच्या कामांसाठी एक खड्डा खोदण्यात आला असून गेल्या ४ महिन्यांपासून या भागात गटारीचे काम आहे. कोणतेही काम वेगाने होत नसून मुसळधार पावसामुळे गावातील सर्व पाणी या सखल भागात येऊन साचले आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी वाढली नागरिकांवर नाक बंद करून जाण्याची वेळ आली आहे. याच पाण्यातून वाहनधारकांना मार्ग काढावा लागत असून नगरपंचायत अधिकार्यांच्या कारभारावर येथील जनतेने नाराजी व्यक्त केली आहे.
एम के हुबळी येथील प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते राजशेखर इंगळगी म्हणाले, एम के हुबळीत ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. येथील रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या नागरिकांना नाक बंद करण्याची वेळ आली आहे. एम के हुबळी नगरपंचायत सभागृह अस्तित्वात येऊन ६ महिने झाले परंतु अद्याप कोणताही विकास झालेला नाही. या भागात डेंग्यूसारखे आजार पसरले असून या आजारावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.()
एम के हुबळी येथे ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाच्या पाण्याबरोबरच गावातील घाण पाणी देखील जमा होत आहे. यामुळे अधिकाधिक रोगराई पसरण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. या समस्येवर नगरपंचायतीने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments