बेळगावात उषाताई गोगटे कन्या विद्यालयात सन 2022-23 शैक्षणिक वर्षाच्या फुलबाग गल्ली क्लस्टरच्या प्रतिभा कारंजी स्पर्धा आज, बुधवारी उत्साहात पार पडल्या.
प्रभाग क्र. 9 च्या नगरसेविका पूजा पाटील व इंद्रजित पाटील यांनी शारदा देवीच्या प्रतिमेची पुजा करुन दीप प्रज्वलन करून या स्पर्धांचे उदघाटन केले. प्रमूख पाहुणे म्हणून बेळगाव शहर विभागाचे गट समन्वय अधिकारी आय डी हिरेमठ उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले. बेळगाव शिक्षण संस्थेचे सहसचिव अरविंद हूनगुंद अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विविध शाळांचे मुख्याध्यापक एम. के. मादार, के. के. चांदवाले, एस. ए. कळेकर, एस. जी. पाटील, ए. डी. सागर, वाय. बी. कुंदगोळ, सिंधू पाटील , मिनाक्षी वडेर , शिक्षण संयोजिका एस एस सूर्यवंशी उपस्थित होते.
या स्पर्धेत फुलबाग गल्ली क्लस्टरच्या सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित 22 शाळातील विध्यार्थ्यानी भाग घेऊन आपली कला प्रदर्शित केले. भाषण, धार्मिक पठण, लघु संगीत, वेशभुषा, कथाकथन, अभिनय गीत, चित्रकला, भक्तिगीत, भावगीत, लोकगीत, भरतनाट्य, मिमिक्री, वादविवाद स्पर्धा, रांगोळी, गझल, हास्य, प्रश्नमंजुषा, कवाली, समूह नृत्य इत्यादी स्पर्धामध्ये हिरीरीने भाग घेऊन कलागुणांचे प्रदर्शन केले. 
विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन फुलबाग गल्लीच्या सीआरपी मंजुळा सिऱ्याप्पन्नवर यांच्या नेतृत्वाखाली व विठलाचार्य शिवनगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी वडेर यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आले.


Recent Comments