Belagavi

चन्नम्मा पुतळ्याच्या चौथऱ्याला भरधाव ट्रकची धडक; पुतळा सुरक्षित

Share

बेळगावचे प्रवेशद्वार असलेल्या राणी चन्नम्मा चौकातील चन्नम्मा यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याला मंगळवारी रात्री उशिरा मद्यधुंद ट्रक चालकाने धडक दिली. सुदैवाने चन्नम्मा यांच्या पुतळ्याला कोणतीही हानी झाली नाही.

मंगळवारी रात्री उशिरा एका भरधाव ट्रकची चन्नम्मा पुतळ्याच्या चौथऱ्याला धडक बसली. यावेळी पुतळ्याभोवती उभारलेल्या लोखंडी बारमुळे ट्रक तेथेच थांबला.त्यामुळे चन्नम्मा पुतळ्याचे कोणतेही नुकसान झाले नाही. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रक तेथून बाहेर काढला.

Tags:

channammacircle belagavi