आपण ज्या संस्थेत शिकलो, त्या संस्थेचे ऋण कधीही विसरता कामा नये असे मत हुक्केरी लक्ष्मी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष के बी मलगौड़नावर यांनी व्यक्त केले.

भरतेश पॅरामेडिकल महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
हुक्केरी तालुक्यातील महाविद्यालयाच्या नव्या इमारतीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात हिरा शुगर्सचे संचालक सुरेश दोड्डलिंगनावर यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर सुरेश दोडलिंगनवर, के बी दोडलिंगनवर,डी एस मगेंनावर, सोमनाथ परकनट्टी, मिलिंद नाडगौडर, सदाशिव मरेंनवर, राजू बागलकोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना राजू बागलकोटी म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणाची ३ वर्षे हि अत्यंत महत्वाची असतात. या तीन महत्त्वाच्या वर्षांत विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरित करण्यात आले. यावेळी लक्ष्मी शिक्षण संस्था व भरतेश पॅरामेडिकल कॉलेजचे व्याख्याते व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.


Recent Comments