Vijayapura

प्रत्येकाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण तत्पर-खासदार रमेश जिगाजिनगी

Share

मतदार संघाच्या विकासासाठी यापूर्वी कोणीही अनुदान आणले नाही तितके अनुदान मी आणले आहे. येथील जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत, अशा शब्दात खासदार रमेश जिगाजिनगी यांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळांना टोला लगावला आहे.

व्हॉइस : विजापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. योजनांव्यतिक्त लाखो करोडो रुपयांचे अनुदान आपण मंजूर करून आणले आहे.. यापूर्वी इतके अनुदान कुणी आणले आहे का? असा सवाल रमेश जिगजीनगी यांनी उपस्थित केला. जर आणले असेल तर त्यांनी गांधी चौक येथे जाहीर चर्चेसाठी यावे, असे आव्हानदेखील जिगजीनगी यांनी दिले. आपण एक सिंहाप्रमाणे आहोत. त्यामुळे आपण प्रत्येकाचे स्वप्न पाहतो. विजापूर प्रवासी मंदिर ते तेलसंग क्रॉस पर्यंत सरासरी ४० किलोमीटर रस्त्याच्या कामकाजासाठी २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची सुरुवात लवकरच होणार आहे, अशी माहिती रमेश जिगजीनगी यांनी दिली. ()

शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय महामार्ग विजयपूर उपविभागामार्फत अनेक कामे सुरु असल्याचे खास रमेश जिगजीनगी यांनी सांगितले. तेलसंग क्रॉस पर्यंतच्या रस्तेविकासासाठी २५० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून दोन वर्षात हे कामकाज पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ()

Tags:

ramesh jigajinagi