Belagavi

बेळगावच्या तानाजी गल्लीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

Share

हिंदू सेवा संघ तानाजी गल्ली या युवक मंडळाच्या वतीने 75 वा अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिन जल्लोषात, उत्साहात साजरा करण्यात आला.

गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल मुचंडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका वैशाली हुलजी, इंद्रजीत घसारी, नितीन तुडवेकर, रमाकांत जांगळे, सूरज गायकवाड, अभिजित चव्हाण, दत्तूसिंह नगरकर, भूषण गुरव, ओमकार बिडीकर, किसन जांगळे, प्रसन्न चव्हाण, रक्षक गायकवाड तसेच गल्लीतील युवक महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आकर्षक अशी सजावट यावेळी करण्यात आली होती.

Tags:

indendanceday 75independanceday belagavi