Belagavi

महिलांना सन्मान आणि स्थान मिळाले पण स्वातंत्र्य नाही : वैष्णवी किवडसन्नवर

Share

अनेक वर्षांपूर्वी मनुशास्त्रात स्त्रियांना चार भिंतीत बंदिस्त करून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. कालांतराने महिलांचे महत्व वाढले, महिला सुशिक्षित झाल्या, त्यांना सन्मान मिळाला, स्थान मिळाले मात्र आजही महिलांना स्वातंत्र्य मिळाले नाही, अशी खंत बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी किवडसन्नवर यांनी व्यक्त केली.

व्हॉइस : बेळगावमधील कारंजी मठात श्रावण महिन्यानिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून काल तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त ”नैतिकता आणि अध्यात्मात महिलांची भूमिका” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या विषयावर बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी किवडसन्नवर यांनी आपले विचार व्यक्त करत पुरुषप्रधान समाजातील महिलांचे महत्व आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर परखड मत व्यक्त केले.महिलांमधील आत्मविश्वास, सामाजिक आरोग्य आणि महिला, घरातील पहिली शिक्षिका म्हणून कर्त्यव्य पार पाडणारी महिला आणि सर्व क्षेत्रात जरी महिला यश मिळवत असल्या तरी नैतिक दृष्ट्या त्या कशा मागे पडत आहेत, यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी श्रीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, आज स्त्रिया ज स्त्रिया कला, साहित्य, क्रीडा, राजकारण, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रात खूप प्रगती करत आहेत. महिलांना पुरुषांनी प्रोत्साहन दिल्यास त्या अधिक प्रगती करू शकतात, महिलांना कुटुंबाप्रमाणेच समाजानेही प्रोत्साहन आणि सहकार्य देणे आवश्यक आहे, असे मत स्वामीजींनी व्यक्त केले.

बेळगाव जिल्हा लेखिका संघाच्या अध्यक्षा जयशीला ब्याकोड यांचा यावेळी श्रीमठातर्फे सत्कार करण्यात आला. समाजसेविका आणि कलाकार शांता आचार्य या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यक्रमास डॉ. मैत्रायीनी गदिगेप्पगौडर, कारंजामठाचे मातृ मंडळ यांनी भक्तीगीत आणि स्वागत गीत गायिले. भारती सन्कन्नावर यांनी स्वागत केले तर नयना गिरीगौडर यांनी आभार मानले.

Tags:

belgaum lingayat shravan