Belagavi

बिबट्या शोध मोहीम आठवड्याभरात पूर्ण होणार; डीएफओ डॉ. अँटोनी

Share

बेळगावमधील गोल्फ कोर्स मैदान परिसरात आढळलेला बिबट्या हा जंगल परिसरात निसटला असावा परंतु तरीही या परिसरात अद्याप शोध मोहीम सुरूच आहे, येत्या आठवड्याभरात बिबट्या शोध मोहीम संपुष्टात येईल, अशी माहिती डीएफओ डॉ. अँटोनी यांनी दिली.

व्हॉइस : बेळगावमधील गोल्फ कोर्स मैदान परिसरात आढळून आलेल्या बिबट्याच्या हालचालीनंतर या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या भागात वन विभागाने शोध मोहीम हाती घेऊन जवळपास १० दिवस उलटले आहेत. परंतु अद्यापही या बिबट्याचा शोध लागलेला नाही. या परिसरातील २२ शाळांनादेखील जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली होती. वनविभागाने या परिसरात जवळपास २३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून या कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही बिबट्याचा शोध लागलेला नाही. या भागाच्या आसपास असलेल्या मिलिटरी प्रदेशात देखील वनविभाग असल्याने या भागातून खानापूरच्या दिशेने हा बिबट्या गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गोल्फ कोर्स मैदानातून सदर बिबट्या निसटून जंगल भागात गेला असून अद्यापही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. सुमारे २०० एकर भागात गोल्फ कोर्स मैदान व्यापले असून या भागात ६ सदस्यांची एकूण ८ शोधपतके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती डीएफओ अँटोनी यांनी दिली.

महाराष्ट्रातील वनविभागातील येडूरवाडी या भागात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले असून धर्मट्टी येथेही एक बिबट्याचा बछडा आढळून आला आहे. हि हालचाल सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून लवकरात लवकर कारवाई करून ताब्यात घेण्यात येईल, अशी माहितीही डीएफओनि दिली.

यावेळी आमदार अनिल बेनके बोलताना म्हणाले, बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर या भागातील शाळांना सुरक्षेच्या कारणास्तव सुट्टी देण्यात आली होती. परंतु इतके दिवस शाळा सुट्टी देणे शक्य नसल्याने आजपासून पुन्हा शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. वनविभाग, पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांना थोडी खबरदारी घेऊन न घाबरता शाळेत यावे असे आवाहन आमदारांनी केले.

बेळगावमध्ये गेल्या ८ – १० दिवसात बिबट्याने दहशत निर्माण केली असून युद्धपातळीवर बिबट्या शोध मोहीम सुरु आहे. वनविभाग बिबट्याला शोधण्यासाठी तत्परतेने कार्य करत असून आता बिबट्या सापळ्यात अडकणार का हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.

Tags:

belgaum leoperd found belgaum dfo