Belagavi

हिंदुराष्ट्र सेना श्री राम सेनेतर्फे बाईक रॅली काढून स्वातंत्र्यदिन

Share

बेळगावात आज हिंदुराष्ट्र सेना श्री राम सेना यांच्या वतीने आज जल्लोषात बाईक रॅली काढून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. रॅलीदरम्यान शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

हिंदुराष्ट्र सेना श्री राम सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या स्फूर्तीने व अभिमानाने हातात व गाडीवर तिरंगा ध्वज घेऊन बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. रॅली ची सुरुवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे राष्ट्रगान म्हणून करण्यात आली. त्या नंतर कित्तुर राणी चन्नमा सर्कलमध्ये राणी चन्नमा यांच्या पुतळ्याला तसेच बेळगाव कोर्ट येथील संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. त्या नंतर कॅम्प मार्गे गोवावेस सर्कल मध्ये विश्वगुरू श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅली छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान कडे रवाना झाली.छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र म्हणून रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. बेळगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

Tags: