बेळगावातील विजयनगर–हिंडलगा येथील सरकारी प्राथमिक कन्नड व मराठी शाळेत आज ७६वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
होय, देशभरात आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. त्याचप्रमाणे बेळगावातील विजयनगर-हिंडलगा येथील सरकारी प्राथमिक कन्नड व मराठी शाळेत आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आज सोमवारी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे श्रीशैल कोळवी यांच्याहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
त्यानंतर विध्यार्थी, शिक्षक आणि उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले. विध्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाची माहिती देणारी भाषणे केली. 
यावेळी प्रमुख पाहुणे बाळासाहेब नाईक आणि त्यांच्या धर्मपत्नी शामली नाईक यांनी विध्यार्थ्यांसाठी युरेका फोर्ब्स कंपनीचे दोन ऍक्वा गार्ड संच शाळेला भेट दिले. भविष्यातही शाळेला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments