Belagavi

अँपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमीत स्वातंत्र्यदिन

Share

बेळगावमधील अँपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमीत स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅबिन क्र्यूसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता.

बेळगावमधील अँपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमीच्या माध्यमातून या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत भविष्य निर्माण करण्याची संधी देत आहे. या अकादमीच्या कार्यालयात आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने कॅबिन क्र्यूसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. आमदार अनिल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पवन होसमणी आणि प्रीत भोजन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अँपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमीचे संस्थापक विनोद बामणे आणि ज्योती बामणे यांचे आमदार अनिल बेनके यांनी कौतुक केले. विनोद बामणे आणि ज्योती बामणे हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी चांगले काम करत आहेत. ज्यांनी येथे शिक्षण घेतले आहे, ते आणखी मोठ्या पदांवर जाण्यासाठी सक्रिय झाले असून पराभवाचा विचार न करता नेहमी विजयी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत आमदारांनी व्यक्त केले. यावेळी पवन होसमनी या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करताना अँपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमीचे आभार मानले. या संस्थेत मिळालेल्या शिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे आपली कॅबिन क्र्यूसाठी निवड झाल्याचे या विद्यार्थ्याने सांगितले. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आमदार अनिल बेनके यांच्याहस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. अँपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरणही केले.

Tags: