७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज हुक्केरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका दंडाधिकारी डॉ. डी एच हुगार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तालुका प्रशासन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात डॉ. डी एच हुगार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना आदरांजली वाहणे हे आपले कर्तव्य आहे, असे हुक्केरी तालुका दंडाधिकारी डॉ डी एच हुगार यांनी सांगितले.
याचप्रमाणे विविध पथकांचे पथसंचलन देखील पार पडले. पोलीस स्थानकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षण रफिक तहसीलदार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर नगरपालिका प्रांगणात पालिका अध्यक्ष आप्पाना पाटील, जुन्या बस स्थानकात दोड्डाप्पा हुगार, नव्या बसस्थानकात राजू बागलकोटी, महावीर शाळेत शाळेचे अध्यक्ष महावीर निलजगी, विजय रवदी फार्म हाऊसमध्ये काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विजय रवदी, ऑटो रिक्षा युनियनच्यावतीने राजू कुरुंदवाडे अशा विविध मान्यवरांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनि ध्वजारोहण केले.
यावेळी मान्यवरांनी संगोळी रायन्ना ज्योतीचे स्वागत केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध शाळेच्या विद्यार्थ्यांचे देशभक्ती गीत गायन आणि विविध देशभक्तीपर कार्यक्रम पार पडले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केले.
उमेश सिदनाळ, ए दी एल आर शशिकांत हेगडे, बीईओ मोहन दंडीन, मुख्याधिकारी मोहन जाधव, ग्रेड २ तहसीलदार किरण बेळवी, नेते आनंद गंध, उदय हुक्केरी, महावीर निलंजगी, पालिका सदस्य, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हुक्केरीत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


Recent Comments