Chikkodi

देशसेवेसाठी प्रत्येकाने कटिबद्ध असावे : एसी संतोष कामगौडा

Share

देशसेवेसाठी प्रत्येकाने कटिबद्ध असावे, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या सतत स्मरण करत देश घडविण्यासाठी तत्पर राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त संतोष कामगौड यांनी केले.

चिकोडी तालुका क्रीडांगणावर अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्लास्टिक बंदी, जंगल भागाचे जतन, पर्यावरण संवर्धन आणि कन्नड भाषा यावर आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले. याचप्रमाणे ज्येष्ठ आणि गुरुजनांचा आदर राखून देशाच्या संस्कृतीचेही जतन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गणेश हुक्केरी हे होते. यासह विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, महांतेश कवटगीमठ, प्रवीण कांबळे, संजय कवटगीमठ, बाळासाहेब वड्डर, तहसीलदार सी एस कुलकर्णी, डीवायएसपी बसवराज एलिगार, सीपीआय आर आर पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, नगरपालिका सदस्य साबीर जमादार, नागराज बुरुड आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: