बेळगावातील वडगाव–येळ्ळूर रस्त्यावर बळ्ळारी नाल्याजवळ असलेल्या राईस मिलसमोर होंडा ऍक्टिवा घसरून झालेल्या अपघातात युवा चालक जागीच ठार झाला. हा अपघात आज, सोमवारी सकाळी झाला.
दुचाकी चालक वडगावहून येळ्ळूरच्या दिशेने चालला होता. यावेळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याची ऍक्टिव्ह स्कुटर रस्त्याच्या बाजूला घसरली. यावेळी तोल जाऊन रस्त्यावर आपटल्याने डोके फुटून तो जागीच ठार झाला. रस्त्यावर जोराने आपटल्यानंतर त्याचा मेंदू फुटून रस्त्यावर पडला होता. अपघातस्थळी भीषण धक्कादायक दृश्य निर्माण झाले होते. दुचाकी चालकाने हेल्मेट घातले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता अशी प्रतिक्रिया घटनास्थळी व्यक्त करण्यात येत होती. वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृताची ओळख पटविण्यात येत आहे.
Recent Comments