राष्ट्रीय पक्षी मोर नाचताना पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. विजापुरातील गोलघुमट परिसरात मयुराने मनमोहक नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गोलघुमटासमोरील उद्यानात ढगाळ वातावरणात पंख फडफडवून मोर नाचताना दिसून आला. लोकांचा आवाज ऐकूनही पिसे पसरून नृत्य करणाऱ्या मोराला पाहून उपस्थित सगळेजण मंत्रमुग्ध झाले. या राष्ट्रीय पक्ष्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.


Recent Comments