Belagavi

कागवाड येथे कायदा जागृती, हर घर तिरंगा कार्यक्रम

Share

जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण बेळगाव व तालुका कायदा सेवा समिती, कागवाड यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा मोहीम व कायदेविषयक जनजागृती असा संयुक्त कार्यक्रम सिव्हिल व जेएमएफसी न्यायाधीश चन्नबसप्पा कोडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.


कागवडा तालुका व बेळगाव जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण कागवाड वकिल संघ, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उगार नगरपालिका यांच्या वतीने उगार खुर्द शहरात कृष्णवेणी सभागृहात कायदा जागृती व सहाय्य कार्यक्रम पार पडला.
यावेळी कागवाड येथील ऍड. आर. एम. शिंगे यांनी, “ऍसिड हल्ला पीडितांना कायदेशीर सेवा” या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले की, ऍसिड हल्ल्यातील महिलेवर प्रथम रुग्णालयात उपचार करणे आणि तिला सर्व सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे.
न्यायाधीश चन्नबसप्पा आर. कोडी यांनी ऍसिड हल्ल्यांच्या घटनांबाबत कायदेशीर मदत आणि तरतुदींची माहिती दिली. “हर घर तिरंगा”बद्दल माहिती देताना, हा तीन दिवसांचा कार्यक्रम असून प्रत्येकजण देशाप्रती आपली भक्ती व्यक्त करू शकतो. मात्र, तिरंगा ध्वजाचा अवमान करू नये. तो फेकून देणे हा गुन्हा आहे. तीन दिवसांनी ते तासाभरासाठी घरी ठेवता येईल किंवा स्थानिक पंचायतीकडे सोपवता येईल, असे त्यांनी सुचवले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागवाड वकील संघाचे अध्यक्ष वाय. बी. यडुरे होते. यावेळी उगार नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनील बबलादी, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी श्रीमती. आर. एल. कमते, राकेश पाटील, नगरसेवक प्रफुल्ल तोरसे, सुजय फराकटे, बाबुराव कुलकर्णी, बार असोसिएशनचे सदस्य अरविंद भंडारे, संतोष निंबाळकर, सुरेश भरमदे, रावसाहेब राव, अमित दीक्षित, एम.एस. होनकांबळे, आर. एम. शिंगे, आर.एच. सालिमनी , के. व्ही. उप्पार, मल्लिकार्जुन कुंभार, आशा व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
त्याचप्रमाणे शिरगुप्पी आणि कागवाडमध्येही बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली “कायदेशीर जागरूकता सहाय्य कार्यक्रम” घेण्यात आला.

Tags: