बेळगावमधील के एल इ संस्थेच्या उच्च शिक्षण अकादमी आणि संशोधन संस्थेच्या वतीने आझादीका अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगावमधील के एल इ संस्थेच्या उच्च शिक्षण अकादमी आणि संशोधन संस्थेच्या वतीने आझादीका अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत देशाच्या फाळणीच्या काळात घडलेल्या भीषण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या फाळणीवर आधारित पेंटिंग एक्झिबिशनचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. 
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा शंकरगौड, काहेर कुलगुरू डॉ. विवेक सावोजी, रजिस्ट्रार डॉ. व्ही ए कोटीवाले आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना साहित्यिक इंदिरा शंकरगौड म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात सोहळा साजरा होत आहे. देशभरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जात आहे. हे पाहून एका बाजूला आनंद होत आहेच परंतु दुसरीकडे देशाच्या फाळणीच्या संदर्भात दुःखही होत आहे. यावेळी इंदिरा शंकरगौड यांनी देशाच्या फाळणीसंदर्भातील आठवणींना यादरम्यान उजाळा दिला.
यावेळी काहेरच्यावतीने इंदिरा शंकरगौड यांचा संक्रमण करण्यात आला. तसेच विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.


Recent Comments