Belagavi

बेळगावात शहीद जवानांच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली

Share

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवण्यात येत आहे. बेळगावातही आज सुभाष नगर रामनगर येथील रहिवाशांनी तिरंगा रॅली काढली.

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी सुभाष नगर येथील जवान क्वार्टर्स येथे शहीद जवानांच्या स्मरणार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनाके यांनी शहीद जवानांच्या पत्नींचा सन्मान केला. ही रॅली सुभाष नगर जवान क्वार्टर्सपासून सुरू होऊन शेख कॉलेज सर्कल, केएलई रोड, श्रीकृष्ण देवराय सर्कल, एसपी ऑफिस रोड मार्गे सुभाष नगर येथील गणपती मंदिर येथे समाप्त झाली. रॅलीत प्रत्येकाने हातात राष्ट्रध्वज धरून आपली देशभक्ती दाखवली.

यावेळी अखिल भारत वीरशैव महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद आणि समाजसेवक प्रवीण पाटील यांनी आमच्या इनन्यूजशी बोलताना सांगितले की, देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या बेळगावातही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

यावेळी सुरेश रणसुभे, विनायक पाटील, विक्रम आपटेकर, विष्णू बडमंजी, वीरनारी हीराबाई बेंडवाडे, सोनाबाई अनगोळकर, श्रीमंती दशरथ निंगाप्पगोळा, छाया शिंदे, केंचम्मा हिप्परगी यांच्यासह सिद्धेश्वरी व रामनगर महिला मंडळ व युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Tags: