स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कडोली या गावातील माजी सैनिकाने संगोळी रायन्ना यांच्यावरील गीत गायनाने लक्ष वेधून घेतले आहे.
: बेळगाव तालुक्यातील कडोली या गावातील माजी सौनिक कल्लाप्पा मल्लप्पा नरोटी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिवीर संगोळी रायन्ना शौर्य गीत गायिले आहे. क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या जीवनावर आधारित गीतरचना करू विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे गीत गायन करवून घेऊन एका आगळ्या पद्धतीने देशप्रेम दाखवून दिले आहे.
बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील माजी सैनिक कल्लाप्पा नरोटी यांनी देशसेवेसाठी २२ वर्षे सैन्यात सेवा बजाविली आहे. यानंतर मुंबईमध्ये साजिद नाडियावाला फिल्मसिटीमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ बॉडीगार्ड म्हणूनही सेवा बजाविली आहे. याचप्रमाणे अशोक आयर्न, श्री विठ्ठल बिरदेव मंदिर ट्रस्ट कमिटीचे संचालक म्हणून त्यांनी सेवा निभावली आहे. क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्यावरील गीतरचना करून त्यांच्या शौर्याची गाथा सर्वदूर नेण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या गाण्याचा प्रसार करण्याचा उद्देश ठेवला आहे. हे गीत त्यांनी स्वतःच संगीतबद्ध केले असून मराठीतून शिक्षण होऊनही त्यांनी कन्नड भाषेत या गीताची रचना केली आहे.
यावेळी या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, संगोळी रायन्ना यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. अशा थोर व्यक्तीबद्दल गीत रचून हे गीत आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायिले हि आनंदाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
आझादीका अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत नरोटी यांनी लिहिलेले, संगीतबद्ध केलेले गाणे आज कडोली येथील शाळेत विद्यार्थ्यांनी गाऊन संगोळी रायन्ना यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त केला आहे. हे गीत गाऊन आपल्याला अत्यानंद झाला असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यावेळी एसडीएसमसी अध्यक्ष संजय कांबळे, गजानन कागणीकर, दत्ता सुतार आदींसह ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments