Belagavi

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमटेश विद्यापीठात कार्यक्रम

Share

बेळगावमधील हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठाच्या शाळा आणि महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने प्रभात फेरी आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावमधील हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापिठाच्या शाळा – महाविद्यालयांच्या वतीने आज भव्य प्रभात फेरी काढण्यात आली होती. या वेळी विद्यापीठातील सुमारे ६००० विद्यार्थी आणि ५०० शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या प्रभात फेरीत शाळा महाविद्यलयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेत सहभाग घेतला होता.

गोमटेश विद्यापीठाच्या सभागृहात विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धा, रंगोली स्पर्धा, देशभक्ती गीत गायन स्पर्धा, वेशभूषा यासह अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं एहोते. विद्यापीठाचे अध्यक्ष आणि बेळगाव ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे संचालक सनत कुमार विवि, राजेश पाटील, अभय अवलक्की, बापुसो पाटील,, गोपाळ पाटील, डीएस हनगंडी, अर्चना नांद्रेकर, महेश कारेकर, सुनील पाटील, कस्तुरी एम, ज्योत्स्ना हणमंतगौड, भैरू पाटील आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: