Bailahongala

सौंदत्ती : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेसची पदयात्रा

Share

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक मतदार संघात ७५ किलोमीटर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सौंदत्ती मतदार संघात काँग्रेस नेते विश्वास वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक मतदार संघात ७५ किलोमीटर पदयात्रेचे आयोजन करण्यात येत असून या अंतर्गत सौंदत्ती मतदार संघातून काँग्रेस नेते विश्वास वैद्य यांच्या नेतृत्वाखाली इनामहोंगल ते यरगट्टी अशा ७५ किलोमीटरच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या पदयात्रेत इनामहोंगल, सौंदत्ती, हुलिकट्टी मार्गावरून गुरुवारी पदयात्रा सुरु झाली. यरगट्टी भागात पदयात्रेची सांगता झाली. या पदयात्रेचे नेतृत्व केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते विश्वास वैद्य यांनी केले. विविध कलासंघ, वाद्यवृंद या पदयात्रेत सहभागी झाले होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरण करत शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेच्या सांगतेनंतर यरगट्टीमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना विश्वास वैद्य यांनी सांगितले, गेल्या २२ वर्षात या मतदार संघात कार्यकर्त्यांच्या इतका मोठा प्रतिसाद आपण पहिला नाही. काँग्रेस कार्यकर्ते इतक्या मोठ्या प्रमाणात आता एकवटले असून सौंदत्ती हा एकमेव मतदार संघ आहे ज्याठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्तेकार्यरत आहेत. सौंदत्ती मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येकाने अशाच पद्धतीने एकत्रित येऊन कार्यरत राहिले पाहिजे, असे विश्वास वैद्य म्हणाले. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार आर व्ही पाटील, सदाशिव कौजलगी, वीरेंद्र एलिगंट, गलबी चेअरमन, महांतेश वककुंद आदींसह मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Tags: