Chikkodi

बावनसौंदत्तीमधील सुगंधा देवी मंदिर पाण्यात बुडाले

Share

रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती येथील सुगंधा देवी मंदिर कृष्णानदीच्या पुरामुळे जलमय झाले आहे.
गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसामुळे कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या काठावरील बावनसौंदत्ती येथील सुगंधा देवी मंदिर जलमय झाले आहे. यामुळे भाविकांची निराशा झाली आहे. पुन्हा पुराची भीती लोकांना भेडसावत आहे.महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे आज कृष्णा नदीत 2 लाख क्युसेक्सहून अधिक पाणी वाहत आहे. तालुका प्रशासनाने खबरदारी घेत नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Tags: