Bailahongala

पक्षाने संधी दिल्यास सौंदत्तीमधून निवडणूक लढविणार : विश्वास वैद्य

Share

२०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली नाही तर आपण राजकारणातून सन्यास घेण्यात असल्याचे विधान सौंदत्ती येथील काँग्रेस नेते विश्वास वैद्य यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सौंदत्ती मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. आपण गेल्या तीस वर्षात सौंदत्ती मध्ये काँग्रेसला असा पाठिंबा पहिला नसून दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा उत्साही पाठिंबा मिळत असल्याचे आता पाहायला मिळत असल्याचे ते म्हणाले. १९८९ मध्ये येथे काँग्रेसचा झेंडा फडकला होता. मात्र यंदा काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सौंदत्ती मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा आपला मानस असून यासंदर्भातील निर्णय हायकमांडवर अवलंबून असल्याचे सांगत या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी आपल्याला समर्थकांचा देखील पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. हायकमांडला सर्व काही माहित आहे, सतीश जारकीहोळी हे आपले बोस आहेत, हायकमांडने ‘बी’ फॉर्म दिल्यास आपण नक्कीच निवडणूक लढवू असे विश्वास वैद्य यांनी स्पष्ट केले.

२०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? या प्रश्नावर उत्तर देताना वैद्य म्हणाले, शंभर टक्के काँग्रेसचीच सत्ता येईल यात संशय नाही. जनतेचाही अशीच इच्छा आहे. सिद्धरामय्या यांच्या प्रयत्नांमुळे राज्याला वैभव प्राप्त झाले असून सिद्धरामोत्सव कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा पाठिंबा पाहिल्यास पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल, असा माझा ठाम विश्वास असल्याचे विश्वास वैद्य म्हणाले.

Tags: