आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने जनजागृती करण्यासाठी, बेळगावच्या शाहू नगरामध्ये तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली.

शुक्रवारी बेळगावच्या शाहू नगरामध्ये तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी शिक्षक शिक्षिका तसेच वॉर्ड नंबर ३३ची नगरसेविका रेश्मा प्रवीण पाटील, संतोष बोरकर, प्रवीण पाटील, सविता करडी, पायपणावर, शीला गडकरी, गीता कोळी, राऊत मॅडम, इंदिरा बाळीकट्टी व सर्व देश भक्त माता भगिनी व बंधूंनी मोठ्या संख्येने भाग घेऊन रॅली यशस्वी केली. कन्नड मराठी प्राथमिक गोरमेंट हायस्कूल शाहूनगर येथून प्रभात फेरीला सुरवात झाली आणि शाहू नगरामध्ये विविध ठिकाणी फिरून त्याची सांगता करण्यात आली .


Recent Comments