हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम परिसरात उद्यान काशी निर्मिती करून पर्यटन स्थळ बनविण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत ६ किलोमीटर लांबीचा दुपदरी मार्ग निर्माण करण्यात येत असून या कामकाजाचा शुभारंभ उमेश कत्ती यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना उमेश कत्ती म्हणाले, हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम परिसरात उद्यान काशी निर्मिती करून पर्यटन स्थळ बनविण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी घेऊन अनुदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ९.५ कोटी रुपयांच्या निधीतून दुपदरी रस्त्याचे कामकाज करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ()
यावेळी बेळगाव पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, हिरा शुगरचे संचालक अशोक पट्टणशेट्टी, पी कार्ड बँकेचे संचालक परगौडा पाटील, बसवराज मार्डी, कंत्राटदार बसवराज मटगार, के करुणाशेट्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते गिरीश देसाई, गुंजारकर पाटील तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments