कागवाडमध्ये शनिवारी आझादीका अमृतमहोत्सव अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे या रॅलीत हत्तीचा समावेश असेल, अशी माहिती कागवाड चे तहसीलदार राजेश बुरली यांनी दिली.
इन न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे. आझादीका अमृत महोत्सव या अभियानांतर्गत शनिवारी तिरंगा ध्वजाची शोभायात्रा निघणार आहे.
सकाळी मल्लिकार्जुन विद्यालयाच्या सभागृहात सर्व देशभक्त जमून त्यानंतर रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीत सर्व शाळेतील हजारो विद्यार्थी सहभागी होऊन राणी चन्नम्मा सर्कल पासून काग्वाडमधील प्रमुख मार्गांवर मार्गस्थ होणार आहे. संपूर्ण रॅलीदरम्यान हत्तीसह तिरंगा ध्वजाची भव्य मिरवणूक होणार आहे.
शेडबाळ परिसरात ११ हजार ध्वज पुरविण्यात आले असून कागवाड जे एम एफ सी न्यायालयाचे न्यायाधीश चन्नबडाप्पा कुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर पंचायतीच्या सभागृहात ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती नगर पंचायत मुख्य अधिकारी महांतेश कोल्हापुरे यांनी दिली. ()
यावेळी नगर पंचायत सदस्य सुभाष ढाले, बाबू ऐनापुरे, बाबासाहेब मेस्त्री, रमेश रत्नपागोळ, नामदेव होणकांबळे, तुकाराम होणकांबळे, रामू नरसाई, नगर पंचायतीचे कर्मचारी अशोक तीर्थ, सुप्रिया हिरेमठ, अनिल कलाल, सुधीर मायापागोळ आदी उपस्थित होते.


Recent Comments