Belagavi

‘जीतो’तर्फे बेळगावात 15 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीर

Share

जीतो संस्था, औषध नियंत्रण खाते, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी बेळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती जीतो संस्थेचे अध्यक्ष पुष्पक हनमन्नावर यांनी दिली आहे.

बेळगावात गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना पुष्पक हनमन्नावर म्हणाले, येत्या 15 ऑगस्ट रोजी शहरातील महावीर भवन येथे सकाळी 8 ते 2 या वेळेत हे भव्य रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरात केएलई ब्लड बँक, बीम्स ब्लड बँक, महावीर ब्लड बँक, बेळगाव ब्लड बँक सहभागी होणार आहेत.रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना एक लाख रुपयांची विमा पॉलिसी दिली जाणार आहे. एक युनिट रक्त तीन जीव वाचवू शकते. त्यामुळे सर्वांनी स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार परिषदेला अभय आदिमनी, हर्षवर्धन इंचल, अमित दोशी आदी उपस्थित होते.

Tags: