खानापूर तालुक्यातील हेम्माडगा रस्त्याच्या मधोमध असलेल्या हलत्री पुलावर पाणी आल्याने प्रवाशांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

खानापूर पोलिसांनी प्रवाशी आणि पर्यटकांना याबाबत सूचना देण्यासाठी या मार्गावर सूचना फलक लावला आहे. मुसळधार पावसामुळे खानापूर- हेम्माडगा रस्ता बंद झाला आहे, तसेच हलत्री पूल खानापूर ते अनमोडकडे जाणारा रस्ता जलमय झाला आहे.याची पर्यटकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करणारा असा फलक लावण्यात आला आहे.


Recent Comments