भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन आमच्या इन न्यूज (आपली मराठी ) कार्यालयात आलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या भगिणींसोबत कर्मचाऱ्यांनी साजरा केला.

नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि देवाने त्यांना चांगले आरोग्य द्यावे आणि त्यांच्या बहिणीचे रक्षण करावे अशी प्रार्थना करतात. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, बेळगाव येथील भगिनी आमच्या सहकाऱ्यांसोबत दरवर्षी रक्षाबंधन बेळगाव येथील इन न्यूजच्या कार्यालयात येऊन साजरा करतात. फ्लो
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या भगिनींनी इन न्यूजच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. यावेळी बोलताना भगिनी साधना म्हणाल्या की, जीवनात आनंद आहे पण शांती नाही. आराम आणि शांतीसाठी परमेश्वराचे स्मरण करा. परमेश्वराच्या स्मरणासाठी ध्यान आवश्यक आहे. ब्रह्मा कुमारी संघटना हेच शिकवते. माणूस म्हणजे काय आणि त्याची कर्तव्ये काय आहेत हे जाणून घेतले पाहिजे. यासाठी नेहमी भगवान परमपित्याचे ध्यान करावे.
यावेळी ब्रह्माकुमारी पार्वती, ब्रह्माकुमारी दीपा, ब्रह्माकुमार श्रीकांत, इन न्यूजचे मुख्य संपादक राजशेखर पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments