Belagavi

लक्ष्मी हेब्बाळकर यांचा कार्यालयात राखीपौर्णिमा

Share

भाऊ बहिणींच्या नात्याचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन. हा रक्षाबंधनाचा सण गुरुवारी सर्वत्र उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयातदेखील राखीपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अनेक समर्थक बंधूंना राखी बांधली.

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बंधुभाव जप्त आपल्या मतदार संघातील जनतेसमवेत राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. कुवेम्पू नगर येथील कार्यालयात साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमास अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाबंधनानिमित्त एका कार्यकर्त्याने लक्ष्मी हेब्बाळकर यांचा टॅटू आपल्या हातावर रेखाटून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याप्रती असलेले आपले बंधुत्वाचे नाते प्रकट केले आहे. सदर कार्यक्रम कुवेम्पू नगर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लक्ष्मी हेब्बाळकर यांचा रक्षाबंधन कार्यक्रम कुवेंपू नगर कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदार संघातील जनतेसह अनेक समर्थकांची मोठी गर्दी या कार्यालयात पाहायला मिळाली. यावेळी स्वतः आमदारांनी समर्थकांच्या हातावर राख्या बांधून स्नेहभाव जपला. या कार्यक्रमात सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती, हे विशेष!

यादरम्यान बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, आपल्या हिंदू संस्कृतीत रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण संकटात असतो आणि आनंदी असतो अशा दोन्ही वेळा आपण एकमेकांना साथ देतो. भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याप्रमाणेच आम्हीहि रक्षाबंधन मोठ्या थाटात साजरा करत आहोत. आपल्या कार्यालयात शेकडो समर्थक हा सण साजरा करण्यासाठी येतात हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी आमदारांनी सर्वांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. उत्तम पीक पाणी, जनतेच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत त्यांनी हातावर टॅटू रेखाटलेल्या समर्थकाचे कौतुक केले.

याचप्रमाणे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे टॅटू आपल्या हातावर कोरल्यामुळे आपल्याला अत्यानंद होत असल्याचे अजित मादार या समर्थकाने आमच्या वाहिनीच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देताना सांगितले.

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयात समर्थकांच्या उपस्थितीमुळे आलेले जत्रेचे स्वरूप पाहून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या आपल्या मतदार संघात किती लोकप्रिय आहेत याची प्रचिती येते. लक्ष्मी अक्का म्हणून संपूर्ण ग्रामीण भागात परिचित असलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या कार्यामुळे जनतेमध्ये नावलौकिक आणि लोकप्रियता मिळविली आहे.

यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू आमदार चन्नराज हट्टीहोळी, सुपुत्र मृणाल हेब्बाळकर आणि कुटुंबीयांनीही लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या या महान कार्याला पाठिंबा दिला. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संपूर्ण मतदारसंघ हे माझे घर आहे आणि येथील जनता माझे नातेवाईक आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आमदारांचे कार्य हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

Tags: