अथणी येथे येत्या शनिवारी म्हणजेच १३ ऑगस्ट रोजी निजसुख श्री शिवशरण हडपद आप्पण्णा यांच्या ८८८ व्या जयंतीनिमित्त अथणी तालुका हडपद समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हुन्नूर यांनी दिली.

अथणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अथणी तालुक्यात हडपद समाजाची लोकसंख्या कमी असून आपला समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकरित्या मागासलेला आहे. या भव्य मेळाव्याच्या निमित्ताने समाजात जागृती करण्याचा उद्देश असून या मेळाव्यास गच्चीनमठाचे श्री शिवबसव गुरु मुरुघ राजेंद्र महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शेट्टरमठाचे श्री मरूळसिद्ध महास्वामी, यक्कंची येथील शी गुरुपद महास्वामी, रबकवी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामी हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून आमदार महेश कुमठळ्ळी, मनगुळी भीमाशंकर शरण आदींसह विशेष निमंत्रित, प्रमुख अतिथी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यास तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
यावेळी सुरेश हडपद, महांतेश हडपद, चन्नु नावी, मारुती नावी, विजय नावी, प्रवीण हडपद, राजू हडपद, आनंद हडपद, सदाशिव हडपद, अमित हडपद, अमरसिंह हडपद , सुनील हडपद , सचिन हडपद , धरेप्पा हडपद , सिद्दू हडपद , कुमार नावी, बसवराज नावी, शंकर नावी, बसू नावी, पद्मन्ना हडपद आदींसह समाजबांधव उपस्थित होते.


Recent Comments