हुबळी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशवकुंज कार्यालयात काँग्रेसतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना राष्ट्रध्वज भेट देण्यात आला.
हुबळीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज बुधवारी रा. स्व. संघाच्या कार्यालयात जाऊन तिरंगा ध्वज भेट दिला. आधी आम्हाला तो नको आहे, आमच्याकडे राष्ट्रध्वज आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेत्यांनी सांगितले. 
संघाचे नेते अमरनाथ यांनी कार्यालयातून राष्ट्रध्वज आणला आणि आमच्याकडे आहे. आम्ही हा ध्वज फडकवू असे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी राष्ट्रध्वज स्वीकारून “भारत माता की जय”चा जयघोष केला. त्यानंतर आरएसएस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन “भारत माता की जय”चा नारा दिला.


Recent Comments