कृष्णा खोऱ्यातील पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वारंवार वाढ होत आहे. आलमट्टी लाल बहादूर शास्त्री जलाशयातून आणखी पाणी सोडण्याची शक्यता असल्याने धरणाच्या खालच्या बाजूच्या गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. यलगुर ग्रामपंचायतीने माईकद्वारे ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील यलगुर ग्रामपंचायतीने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केबीजेएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी आलमट्टी जलाशयातून १ लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. आज आवक वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे.


Recent Comments