महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा समावेश झाल्याने कागवाड मतदार संघातील भाजपाचे कार्यकर्ते तसेच चिकोडी जिल्हा बीजेपी पक्षाचे उपाध्यक्ष विनायक बागडी व इतर कार्यकर्त्यांनी मुंबई येथे जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

मुंबईत आज, मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ रचनेमध्ये कागवाड मतदार संघाच्या शेजारील महाराष्ट्रातील मिरज मतदार संघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांची वर्णी लागली आहे.
यामुळे कागवाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी नूतन मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा मुंबई येथे जाऊन सत्कार केला.विनायक बागडी यांच्या नेतृत्वाखाली येथील कार्यकर्त्यांनी यापूर्वी आमदार सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन महाराष्ट्र पोलीस मिरज येथे कर्नाटकातील वाहनधारकांना अडवून विनाकारण त्रास देतात, त्यावर आ. खाडे यांचे लक्ष वेधले होते. आ. खाडे यांनी तातडीने जिल्हा पोलीस प्रमुखासह इतरांना विनाकारण कर्नाटकातील वाहनधारकांना त्रास देऊ नये असा आदेश दिला होता. त्याचाच परिणाम म्हणून अनेक दिवसापासून थोडासा नाहक त्रास थांबला आहे.
यामुळे येथील कार्यकर्ते नूतनमंत्र्यांचा सत्कार करून आपला आनंद व्यक्त केला आहे.या सत्कार समारंभ वेळी विनायक बागडी, किरण शिंदे, आप्पासाहेब चौगुले, शिवानंद मगदूम, बाळू उमदी, विजय भंडारे, उमेश आरगे आदी उपस्थित होते.कागवाड येथे भाजप कार्यकर्त्यांनी आ. खाडे यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल फटाके उडवून आपला आनंद व्यक्त केला आहे.


Recent Comments