बेळगावातील चव्हाट गल्लीतील सरपंच व महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते महादेवराव मोहिते यांचे मंगळवारी सायंकाळी 5 वाजता दुःखद निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.
स्वर्गीय महादेवराव मोहिते यांच्या पार्थिवावर आज रात्री 8 वाजता चव्हाट गल्लीच्या स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, 4 मुलगे, 4 मुली, जावई-सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Recent Comments