Belagavi

बेळगावात गोल्फ मैदानाजवळ पुन्हा बिबट्याचे दर्शन; वनखात्याच्या कॅमेऱ्यात चित्रण 

Share

बेळगावात गेल्या पाच दिवसांपासून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत लपाछपी खेळणाऱ्या आणि बेळगावकरांच्या उरात धडकी भरवलेल्या बिबट्याच्या हालचाली अखेर कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेने सतर्क राहावे असे आवाहन डीएफओ अँथोनी यांनी केले आहे.

होय, बेळगावच्या गोल्फ क्लबजवळील जाधवनगरमध्ये गेल्या शुक्रवारी बांधकाम मजुरावर हल्ला करून गायब झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची कारवाई आज, मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू झाली. गेल्या शुक्रवारपासून गोल्फ कोर्सवरील झाडांच्या दाटीत बसलेली ही बिबट्याची आकृती काल, सोमवारी रात्री वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पकडली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने चोवीस तास शर्थीचे प्रयत्न करत आहे. सहा पिंजरे, 16 सीसीटीव्ही कॅमेरे वापरण्यात आले आहेत. पन्नास वन कर्मचारी शोधकार्यात गुंतले आहेत. डीएफओ एच.एस. अँथनी, एसीएफ मल्लिनाथ कुसनाळ आणि इतर कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारी पहाटेपासूनच बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा मोहीम राबवली.

बेळगावच्या गोल्फ मैदानात लावलेल्या कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल आढळून आल्याने नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाच्या कारवाईला सहकार्य करावे, असे आवाहन डीएफओ एच. एस. अँथोनी यांनी केले आहे.

एकंदरीत गोल्फ कोर्स बेळगावातील हनुमान नगरच्या बाजूला आहे. याच्या आजूबाजूला व्हीआयपी वस्ती आहे.  वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या शोधासाठी मोहीम सुरूच ठेवली आहे. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: