बेळगाव शहरातील पाटील गल्ली येथील गटारी ब्लॉक झाल्याने पावसाचे पाणी वाहून न जात घराघरात शिरत आहे. ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने येथील नागरिक सध्या हैराण झाले आहेत. हि समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी विनंती पाटील गल्ली येथील रहिवासी करत आहेत.
पाटील गल्ली येथील घर नं ५६१/६२ मधील चिराग पोरवाल यांच्या घरात गटारी आणि ड्रेनेजचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हि परिस्थिती ओढवली असून या भागात ड्रेनेजची व्यवस्था नसल्याचे हि समस्या उद्भवल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.
यासंदर्भात चिराग पोरवाल या रहिवाशाने सांगितले, पावसाचा जोर वाढला कि हि समस्या नेहमीच या परिसरात उद्भवते. घरात ड्रेनेज आणि गटारीचे पाणी शिरून घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्येसंदर्भात अनेकवेळा अधिकाऱ्यांना निवेदन, सूचना देण्यात आल्या परंतु या समस्येकडे कोणीही लक्ष पुरविले नाही, अशी तक्रार पुढे आली आहे.
गटारी आणि ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्याकारणाने येथील नागरिकांना हा फटका सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर थोडा जरी वाढला तरी नेहमीच हि समस्या या परिसरातील नागरिक अनुभवत असतात. या भागातील लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरवून तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.


Recent Comments