Belagavi

बेळगावच्या कामत गल्लीत घर कोसळले

Share

बेळगाव शहरात पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे घरांची पडझड होण्याचे सत्रही सुरूच आहे. नव्या घटनेत  कामत गल्लीतील एक घर कोसळले असून आता हे कुटुंब बेघर झाले आहे.

होय, बेळगाव शहरात मुसळधार पावसामुळे शहरातील कामत गल्ली येथील अनिल बडमंजी यांचे घर काल, सोमवारी रात्री कोसळले. सुदैवानेच यावेळी मोठा संभाव्य अनर्थ टळला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढल्याने बडमंजी कुटुंबीयांनी नुकतेच हे घर सोडून दुसरीकडे स्थलांतर केले होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसामुळे घराची भिंत पडल्याने संपूर्ण छत कोसळून घराचे पूर्ण नुकसान झाले असून घरातील वस्तूंचेही नुकसान झाले आहे. याबाबत अनिल बडमंजी यांनी आमच्या इन न्यूज-आपली मराठीशी बोलताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आमच्या घराला असलेला धोका लक्षात घेऊन दोनच दिवसांपूर्वी दुसऱ्या ठिकाणी भाड्याने घर घेतले. काल सोमवारी रात्री घर कोसळले. या घराच्या मागील भागात आमचा भाऊ राहतो. घर पडल्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई देण्याची विनंती केली. अनिल बडमंजी यांचे भाऊ सुनील बडमंजी यांनी यावेळी सांगितले की, मुसळधार पावसामुळे आज सकाळी आमचे घर कोसळले. या घराच्या पुढच्या भागात माझा धाकटा भाऊ राहतो. मी मागील बाजूला राहायचो. घर पडल्याने माझे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बडमंजी कुटुंबाचे घर पावसामुळे कोसळल्याने आता ते बेघर झाले आहेत. या घटनेत त्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags: