हिजरी किंवा मुस्लिम वर्षाचा पहिला महिना म्हणजे मोहरम. मोहरामला मुहर्रम असेही संबोधले जाते. शांततेचे प्रतीक असणाऱ्या या मुस्लिम बांधवांच्या सणाचे आचरण हुक्केरी मध्ये शांततेत पार पडले.

हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी, पाश्चापूर, संकेश्वर, हुक्केरी आदी भागात शांततेत मोहरम आचरणात आणण्यात आला. हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे प्रतीक असलेल्या या सणात हिंदू धर्मीय महत्वाचा वाटा उचलतात. मोहरमच्या पार्श्वभूमीवर आयोजिण्यात येणारी आशूरा प्रथा मोहरमच्या नवव्या दिवशी पार पडते. मुस्लिम धर्मातील सुन्नी आणि शिया या विविध पंतांमध्ये विविध पद्धतीने मोहरम आचरणात आणला जातो.
हुक्केरीमधील विविध भागात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मोहरम साजरा केला. या निमित्ताने पंजांची एकमेकांना भेट देऊन शहरातील विविध भागात पंजांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी बीबी फातिमा पंजाजवळ भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.


Recent Comments