विजापूर जिल्ह्यातील महामार्गांवर मंकी कॅप घालून दरोडे घालणाऱ्या कुख्यात दरोडेखोरांना गांधीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विजापूर शहर बसस्थानकाजवळील नायर पेट्रोल पंपाजवळ दरोड्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पावले उचलून कारवाई केली.
नबीरसुला जिलानी कोरावर, अविनाश रमेश बगाडे, अल्ताफ कुतुबुद्दीन ऐनापूर, मतिन खलील अहमद काझी, समीर अब्दुल रझाक यरगल यांना अटक करण्यात आली. त्यांचा एक साथीदार सर्फराज फरार आहे. अटक केलेल्यांकडून दीड लाख किमतीचे तवेरा वाहन, लोखंडी रॉड, मंकी कॅप, दोरी, मिरची पावडर, एक चाकू जप्त करण्यात आला आहे.


Recent Comments